
‘लगान’ एक दमदार चित्रपट होता. एकी, फोकस, योग्य कौशल्य व प्रशिक्षण मिळाल्यास एखादा कमकुवत संघ सुद्धा सर्व प्रतिकूल परिस्थितींवर कशी मात करू शकतो हे यातून दिसून आले. याशिवाय, स्वातंत्र्यपूर्व काळातील कथेमधे एकदिवसीय क्रिकेट चा वापर करून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचं एक आगळं साधन म्हणूनही तो दमदार ठरला. कुपोषणमुक्त भारताची योजना आखण्यासाठी आपण ही या कथानकाचा उपयोग करू शकतो.