कुपोषणावर मात – ‘लगान’ चा धडा

लगान एक दमदार चित्रपट होता. एकी, फोकस, योग्य कौशल्य व प्रशिक्षण मिळाल्यास एखादा कमकुवत संघ सुद्धा सर्व प्रतिकूल परिस्थितींवर कशी मात करू शकतो हे यातून दिसून आले. याशिवाय, स्वातंत्र्यपूर्व काळातील कथेमधे एकदिवसीय क्रिकेट चा वापर करून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचं एक आगळं साधन म्हणूनही तो दमदार ठरला. कुपोषणमुक्त भारताची योजना आखण्यासाठी आपण ही या कथानकाचा उपयोग करू शकतो.

बाल कुपोषण दूर करणे म्हणजे चक्क ठरलेल्या षटकांमध्ये दिलेल्या धावांच लक्ष्य गाठण्यासारखे आहे. जर तुम्ही आदिवासी मुलींचा विचार करता तेव्हा हे लक्ष्य सर्वात कठीण असते,  मुलांसाठी थोडे कमी आणि बिगर आदिवासी मुलांसाठी आणखी कमी. साहाजिकच तुमचे डावपेच हे दिलेल्या धावा आणि लागणार्या रन रेटवर अवलंबून असतात.

हे करत असताना, तुम्हाला कुठल्याही भारतीय संघाच्या आंतरिक भांडणे या ठरलेल्या खोडीला सामोरं जावं लागतं. प्रत्येक कंपू एकमेकाकडे तुच्छतेने बघतो;  स्तनपानाचे समर्थन करणारे तज्ञ, पूरक पोषणा चे समर्थक तज्ञ, बाळाचे जन्माचे वजन गरजेचे – हे पटवणारे तज्ञ, अगोदर गरोदर मातेची काळजी घ्या म्हणणारे तज्ञ! प्रत्येक तज्ज्ञाला संघाच्या विजयापेक्षा त्याचे अर्धशतक महत्त्वाचे असते. सुज्ञ प्रशिक्षकाने भांडण कमी करणेभागीदारीला प्रोत्साहन देणे आणि विजयाची खात्री करणे गरजेच आहे.

सलामीची फलंदाज साहजिकच गर्भवती आई होय. जर ती कमी बॉडी मास इंडेक्स वाली म्हणजेच शरीराने भरली नसेल, कमी उंची किंवा वयाची असेलल तर ती चक्क शून्य किंवा फक्त काहीच धावा करून बाद होईल. त्यामुळे, पहिलं लक्ष द्यावं लागणार जोखीमीत असलेल्या गरोदर मातांवर – म्हणजेच किशोरवयीन मुली आणि कमी बॉडी मास इंडेक्स (BMI)  वाल्या गर्भवती मातांवर आणि त्यांची योग्य ती काळजी
घेण्यावर.

पण सलामीवीर शून्यावर गेल्यामुळे कोणी हार मानतो का?  गरोदर मातेच वजन योग्यप्रकारे वाढण्याची खात्री करून आपण अजूनही परिस्थिती सांभाळू शकतो. बाळाचं वजन जन्मतः 3 किलोपेक्षा जास्त असणं हे तर बाळाने अर्धशतक ठोकण्यासारखेच आहे. पण जर ते 2 किलोपेक्षा कमी असेल तर ते कमी धावा केल्यासारखे आहे. सबबगर्भवती आईचे वजन योग्य तेवढे वाढणे, तिची पूर्ण तपासणी, वेळीच टिटॅनस वरती इंजेक्शन; हे सर्व दुवे महत्वाचे आहेत. एएनसी आणि टीटी हे तर ‘फ्री हिट’ सारखे आहेत; आपण काहीही धोका न पत्करता रन मिळवण्याची पर्वणीच म्हणा!

सलामीची भागीदारी चांगनी झाली की संघावरचा ताण कमी होतो, तरीही त्याला गाफील राहुन परवडणार नाही. स्तनपानाची सुरुवात ताबडतोड करणे फार महत्वाचे आहे. निसर्गाने दिलेलं संरक्षणात्मक कवच – ‘कोलोस्ट्रम’, मातेचं पहिलं दूध वाया जाता कामा नये. बाळाच्या जन्माच्या एका तासाच्या आत बाळाला ते मिळाले पाहिजे आणि त्यानंतर पहिले सहा महिने केवळ स्तनपानच केले पाहिजे – यात कोणतीही कमतरता राहता कामा नये! बाळाच्या शारिरिक व बौद्धिक वाढीसाठी हे महत्त्वाचे आहे.

पुढील 12 महिन्या चा कालावधी म्हणजे पूरक आहार द्यायचा कालावधी हा पॉवर प्ले‘ सारखा असतो. या काळात मुलाची वाढ मंदावणे, थांबणे किंवा कमी होणे हे धोके उद्भवतात. पॉवर प्ले दरम्यान प्राधान्य म्हणजे विकेट टिकवून ठेवणे – अतिसारमलेरिया किंवा हुकलेल्या गोवर लसीकरणा सारखे उसळते चेंडू आले कि पटकन विकेट गमावल्या सारखेच होते. ह्या वेळी स्तनदा मातांना आठवड्यातून किमान एक किंवा दोन तास अंगणवाडी केंद्रात एकत्र आणणे, त्यांना ‘पॉवर प्ले’ दरम्यान घ्यावयाच्या विविध खबरदारीबद्दल जागरुक करणे हे सर्वोत्तम धोरण आहे. यामध्ये हात धुणे, मलमूत्राची सुरक्षित विल्हेवाट, ORS चा वापर, बालकांना आहार देण्याच्या पद्धती, वाढीचे निरीक्षण आणि इतर अनेक उपाय असू शकतात.

विकेट गमावणे धोकादायक आहेच, परंतु मेडन किंवा निर्धाव षटके देखील तशीच आहेत – टेंशन वाढवणारी व नंतरच्या षटकांमध्ये लागणारा रन रेट वाढवणारी. त्यामुळे बाळाचे वजन दर महिन्याला वाढत नसेल तर नंतरच्या महिन्यांत हे ‘मेक अप’ करणे भाग पडते. म्हणूनच, संथ गतीने का होईना, दर महिन्याला बाळाचे वजन वाढतच जावे. या कालावधीत प्रत्येक धाव महत्वाची ठरते, विशेषत: जेव्हां आऊटफील्ड संथ असते उदा.उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण जास्त असणेलसीकरणाचे कमी कव्हरेज,  जंतांचे औषध न दिले जाणे वगैरे. तेव्हां चौकार षट्कार मारण्याचे प्रयत्न जोखमीचे ठरतात जंतांचे औषध हे विशेष महत्वाचे आहे. दर सहा महिन्यांनी मुलांना जंतमुक्त केले नाही, तर आम्ही प्रत्यक्षात “एकात्मिक जंत विकास योजना” राबवतो – बाल विकास नव्हे. सर्व जंत हुकवर्म्स, राउंडवर्म्स वगैरे खूप आनंदी होतात. ते सुपोषित होतात, मुलाची स्थिती बिघडते.

हे तीन प्रयत्न उघड्यावर शौच थांबवणे , पूर्ण लसीकरण आणि दर सहा महिन्यांनी जंतनाशक निर्मूलन हे एकत्र केले पाहिजेत. बर्‍याचदा हे एकत्र नव्हे तर एकांडे शिलेदार असल्यासारखे एकमेकांपासून स्वतंत्रपणे घडतात. जिथे हे एकत्र होतात तिथे सुधारित आहार पद्धतीं वापरून सुपोषणाचे चौकार-षटकार सहजपणे मारता येतात.

जस आपण कुपोषण जास्त असलेल्या प्रदेशांवर लक्ष केंद्रित करतो, त्याचप्रमाणे आपल्याला कुपोषित मुलांची संख्या कमी असलेल्या अर्थात कुपोषण मुक्तिच्या “गंतव्यस्थानाच्या सर्वात जवळ असलेल्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करणे तेवढेच आवश्यक आहे. किमान मध्यम किंवा अति
तीव्र
कुपोषणापासून मुक्त असलेल्या प्रत्येक ICDS प्रकल्पामध्ये कुपोषण मुक्त पट्टे किंवा ‘ग्रीन झोन’ तयार करण्यासाठी हे निर्धार केला जाऊ शकतो. जसजसा ग्रीन झोन आकाराने विस्तारू लागतो तसतसा तो कार्यकर्त्यांचा उत्साह व आत्मविश्वास वाढवतो आणि सिस्टिम चे लक्ष वेधून घेण्यात यश मिळवतो.

जर हे सगळे फायदे टिकवून ठेवायचे असतील तर, 18-36 महिन्यांच्या बालकांना पुरक पोषणाद्वारे योग्य आहार देणे फार महत्वाचे आहे. भारतात अनेकदा बालकांच्या कुपोषणाची कहाणी ही ‘मध्यम फळी’च्या ढासळण्याची कहाणी असते. बरीच अशी राज्ये आहेत जी सुरुवातीच्या मिळवलेल्या फायद्याचे भांडवल करू शकली नाहीत. पण इतर राज्ये आहेत जिथे प्रारंभिक नुकसानसहन करावे लागले होते पण त्यांनी 6-36 महिन्यांच्या कालावधीत ही पोकळी भरून काढून बरीच प्रगती केली आहे.

36 महिन्यांपलीकडच्या कालावधीत सुपोषण टिकवून धरणे हे फिनिशिंगचे काम आहे – धोनीसारखा कर्णधार यात तरबेज होता. मुलांच्या वाढीकडे लक्ष ठेवणे, मुलांना पूरक पोषण उपलब्ध आहे हे पहाणे, अतिसार किंवा मलेरियाचे कोणतेही एपिसोड नाहीत ह्याची खात्री करणे आणि वजन नियमितपणे वाढते ह्याची खात्री करणे – एवढी माफक काळजी घेतली की बाsssशेवटी, कुपोषणाचं उच्चाटन म्हणजे 3 सामन्यांची मालिका होय. बारीकपणा [wasting ], बुटकेपणा [stunting] आणि कमीवजन दूर करणे असे तीन सामने आहेत. आपण ही मालिका 3-0 नेच जिंकली पाहिजे, त्या शिवाय गत्यंतरच नाही!

लेखक

सतीश बलराम अग्निहोत्री
Emeritus Fellow CTARA and PI CoE
IIT Bombay, Powai, Mumbai 400076
sbagnihotri@gmail.com

Leave a Reply